इमरती देवीने कॅबिनेट बैठकीत लावली हजेरी; निवडणुकीत झाला होता पराभव

मध्यप्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक हरल्यानंतरही प्रदेश महिला व माजी बाल विकास मंत्री इमरती देवी सुमन कॅबिनेट बैठकीमध्ये कशा काय हजेरी लावत आहे, हा प्रश्न मध्यप्रदेशातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चीला जात आहे. मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये इमरती देवी उपस्थित होत्या. तथापि, यापूर्वीच्या बैठकीमध्ये इमरती देवींसह निवडणूक हरणारे मंत्री गिरीराज दंडोतिया सुद्धा उपस्थित होते. दोघेही निवडणूक हरले असून जर त्यांनी पदाचा राजीनामा दिला असेल, तर मग कॅबिनेट बैठकीमध्ये हजर होण्यामागील खरे वास्तव काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भोपाळ (Bhopal).  मध्यप्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक हरल्यानंतरही प्रदेश महिला व माजी बाल विकास मंत्री इमरती देवी सुमन कॅबिनेट बैठकीमध्ये कशा काय हजेरी लावत आहे, हा प्रश्न मध्यप्रदेशातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चीला जात आहे. मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये इमरती देवी उपस्थित होत्या. तथापि, यापूर्वीच्या बैठकीमध्ये इमरती देवींसह निवडणूक हरणारे मंत्री गिरीराज दंडोतिया सुद्धा उपस्थित होते. दोघेही निवडणूक हरले असून जर त्यांनी पदाचा राजीनामा दिला असेल, तर मग कॅबिनेट बैठकीमध्ये हजर होण्यामागील खरे वास्तव काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेसचा आरोप
इमरती देवी निवडणूक हरल्यानंतरही कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित होऊन विभागीय फाइल्सचा निपटारा करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे कुठल्या कायद्यात्मक तरतूदीनुसार इमरती देवी कॅबिनेट बैठकीत हजर होत आहे, अशी विचारणा करीत काँग्रेसने सरकारवर निशाना साधला आहे.

राजीनामा मंजूर झाला नाही
कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थितीबाबत इमारती देवींना प्रश्न केला असता त्यांनी आपल्या राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. परंतु, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अजूनही राजीनामा स्विकार केलेला नाही. राजीनामा मंजूरीचा विशेषाधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे. तथापि, अजूनही त्या मंत्रीपदावर कायम असल्यामुळे कॅबिनेट बैठकीत उपस्थित होऊ शकतात. त्याचप्रमाणे गिर्राज दंडोतिया आणि एदल सिंह कंसाना यांचा सुद्धा राजीनामा मंजूर झालेला नाही. परिणामी मंत्री निवडणूक हरले असतानाही कॅबीनेट बैठकीमध्ये हजर होत आहे.