Mysterious Disease

शहरातील काही मुलांना आणि रुग्णांना आधी चक्कर आणि मळमळ ही लक्षणे आढळली नंतर बेशुद्ध झाले होते. तसेच काही रुग्ण आजारी पडल्यानंतर थोडा वेळात बरेही झाले. अशा अचानक घडलेल्या घटनेनंतर कुठलातरी आजार पसरला असल्याची चर्चा स्थानिक करत आहेत.

मध्य प्रदेश : देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनाचे संकट देशावर घोंघावत असताना आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) एलुरु शहरात नव्या आजाराने धुमाकूळ घातला (mysterious disease) आहे. या रहस्यमयी आजाराची लागण लोकांना मोठ्या प्रमाणात झाली आहे. एकाच रात्रीत तब्बल १४० लोकांना या आजाराची लागण (infected 140 patients ) झाल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा आजार कोणता आहे. यावर डॉक्टरांनाही उत्तर सापडले नाही. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील काही मुलांना आणि रुग्णांना आधी चक्कर आणि मळमळ ही लक्षणे आढळली नंतर बेशुद्ध झाले होते. तसेच काही रुग्ण आजारी पडल्यानंतर थोडा वेळात बरेही झाले. अशा अचानक घडलेल्या घटनेनंतर कुठलातरी आजार पसरला असल्याची चर्चा स्थानिक करत आहेत.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एकेके श्रीनिवास यांनी या घटनेबाबत महिती दिली आहे की, शहरीतील सर्व परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते तपासासाठी पाठवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्या रुग्णांचे सिटी स्कॅन आणि इतर अहवालही सामान्य असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार विषानूजन्य संसर्गाचा असू शकतो असे पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे संयुक्त जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी सांगितले आहे.