बडोद्यात तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळली; तीन कामगारांचा मृत्यू

गुजरातमधील (Gujarat)  बडोदे (Vadodara ) येथील तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळल्याची (under-construction building collapsed ) माहिती समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला आहे.

गुजरातमधील (Gujarat)  बडोदे (Vadodara ) येथील तीन मजली इमारत पत्यासारखी कोसळल्याची (under-construction building collapsed ) माहिती समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला आहे. परंतु या घटनेत तीन कामगारांचा दुर्देवीपणे मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. असे येथील स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न (Rescue operation underway) सध्या सुरू आहेत.