Cyclone Yaas | बंगालमध्ये यास चक्रीवादळामुळे ३ लाख घरांचे नुकसान, १ कोटी जनता प्रभावित : ममता बॅनर्जी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
इतर राज्ये
Published: May 27, 2021 07:30 AM

Cyclone Yaasबंगालमध्ये यास चक्रीवादळामुळे ३ लाख घरांचे नुकसान, १ कोटी जनता प्रभावित : ममता बॅनर्जी

बंगालमध्ये यास चक्रीवादळामुळे ३ लाख घरांचे नुकसान, १ कोटी जनता प्रभावित : ममता बॅनर्जी

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.

    कोलकाता : यास चक्रीवादळामुळे (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. तसेच, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.

    मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे सांगितले. तसेच, 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पूर्व मेदिनीपूर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा भागांचा दौऱ्या करणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

    Comments

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

    View Results

    Loading ... Loading ...
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.