हा तर बेजबाबदारपणाचा कळस -कोरोनाकाळातही अहमदाबादमध्ये निघाली कलश यात्रा,हजारो महिला झाल्या सहभागी

मध्य गुजरातमधील साणंद येथे एका गावातील महिला मोठ्या संख्येने एका धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर उतरल्या. डोक्यावर कलश घेऊन शेकडोच्या संख्येने जमलेल्या या महिलांनी रस्त्यावरुन चालत कलश यात्रा(Kalash yatra in gujrat) काढली.

    देशाप्रमाणेच गुजरातमध्यही(Gujrat) कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.असे असतानाही इथला एक धक्कादायक प्रकार व्हिडीओ व्हायरल(Viral Video) झाल्यामुळे समोर आला आहे.

    मध्य गुजरातमधील साणंद येथे एका गावातील महिला मोठ्या संख्येने एका धार्मिक कार्यक्रमासाठी रस्त्यावर उतरल्या. डोक्यावर कलश घेऊन शेकडोच्या संख्येने जमलेल्या या महिलांनी रस्त्यावरुन चालत कलश यात्रा काढली. या यात्रेचा(Kalash Yatra) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    या व्हिडीओमध्ये महिलांनी कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन केलं आहे. सोशल डिस्टन्सिंगही न ठेवता गर्दी करुन या महिला रस्त्यावरुन चालताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या महिला डोक्यावर कलश घेऊन बालियादेव मंदिरामध्ये जात होत्या.

    धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अहमदाबाद जिल्ह्यामध्येच हा प्रकार घडला आहे. साणंदमधील नवापुर आणि निर्धार्ध गावामध्ये पुजा करण्यासाठी मंगळवारी म्हणजेच ४ मे रोजी या महिला मोठ्या संख्येने एकत्र जमल्या होत्या.

    या महिलांनी कोरोनासंदर्भातील कोणतेच नियम पाळले नाहीत. त्यानंतर मंदिरात पोहचल्यानंतर मोठ्याने गाणी लावून या महिलांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती अहमदाबाद ग्रामीण पोलिसांचे उपअधीक्षक के.टी. कमारीया यांनी दिली आहे.