गुजरातमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात,  १० जणांचा जागीच मृत्यू

आनंद जिल्ह्यातील तारापूरच्या इंद्रनज गावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. समोरील कारमधून एकाच कुटुंबातील १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  या भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडले आहे. मृतांमध्ये २ महिला, ७ पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सूरतकडून भावनगरला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली.

    आनंद – गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील तारापूरजवळ कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.  वेगात येणाऱ्या ट्रकची कारची समोरासमोर धडक बसल्याने सगळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    आनंद जिल्ह्यातील तारापूरच्या इंद्रनज गावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. समोरील कारमधून एकाच कुटुंबातील १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  या भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडले आहे. मृतांमध्ये २ महिला, ७ पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सूरतकडून भावनगरला जात असताना ही भीषण दुर्घटना घडली.

    दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच  मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.