asuddin owaissi

हैदराबदमध्ये टीआरएसने प्रचारामध्ये स्थानिक प्रश्न मांडले नाही. तसेच काही वर्षांमधील कामगिरी मतदारांची नाराजी ओढावणारी ठरली आहे. त्यामुळे टीआरएसला एमआयएमसोबतच्या छुप्या युतीवरुनही टीआरएसवर टीका करण्यात आली. परंतु याच छुप्या युतीमुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

हैदराबाद : हैदराबादमध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमद्ये तीन पक्ष विजयी झाल्यामुळे त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी हैदराबादमधील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमत मिळाले नाही. परंतु एमआयएमच्या पाठिंब्याने ते पुन्हा सत्तेत यऊ शकतात. हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याच्या मनसुब्याने निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला सत्ता मिळवण्यात यश आले नसले तरी ४ जागांवरुन ४४ जागांवर मजल मारली आहे. टीआरएसला ५५ जागा मिळाल्या असल्यामुळे हैदराबादमधील सर्वात मोठा पक्ष झाला आहे.

हैदराबाद महापालिका निवडणूकीमद्ये १५० जागांवर ४६.६ टक्के मतदान झाले होते. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळेच भाजपचे सर्व दिग्गज नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेते हैदराबादमध्ये प्रचारासाठी आले होते. या प्रचारामध्ये योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे सांगितले होते. तर गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना साद घालत हैदराबादमधील निजामशाही संपुष्टात अणायची आहे. असे वक्तव्य करत असुद्दीन ओवैसी आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर रोड शो दरम्यान टीका केली होती.