कुलगाम जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या महासचिवासह ३ जणांची गोळ्या घालून हत्या

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Kulgam ) जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या महासचिवासह ३ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील पोरा गावात रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा (Lashkar-E-Taiba) समर्थक दहशतवादी संघटना 'रेझिस्टंट फ्रंट' (TRF) यांनी घेतली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Kulgam ) जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या महासचिवासह ३ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कुलगाम जिल्ह्यातील पोरा गावात रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा (Lashkar-E-Taiba) समर्थक दहशतवादी संघटना ‘रेझिस्टंट फ्रंट’ (TRF) यांनी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध आणि दुःख व्यक्त केलं. पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “माझ्या तीन तरुण कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. जम्मू-काश्मीरमध्ये चांगले काम करत होते.”

या घटनेनंतर TRF संघटनेकडून असे आणखीन हल्ले करण्यात येतील अशी थेट धमकीच दिली आहे. या घटनेमुळे कुलगाम जिल्हा हादरला असून सध्या या परिसरात खळबळ उडाली आहे. वाईके पोरा भागातून भाजप युवा मोर्चाच्या महासचिवाची गाडी जात असताना दहशतवाद्यांनी आधी कार्यकर्त्यांवर हल्ला केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सगळ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी प्राण सोडले होते.