शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणातच; कमल हासन यांचे स्पष्टीकरण

मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहील, असे ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मैय्यमचे अध्यक्ष कमल हासन यांनी स्पष्ट केले. कमल हासन यांनी तमिळनाडूची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. हासन यांनी स्वतः दक्षिण कोयम्बतूरमधून निवडणूक लढवली होती. पण त्यांनाही भाजपाच्या उमदेवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.

    चेन्नई : मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहील, असे ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मैय्यमचे अध्यक्ष कमल हासन यांनी स्पष्ट केले. कमल हासन यांनी तमिळनाडूची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. हासन यांनी स्वतः दक्षिण कोयम्बतूरमधून निवडणूक लढवली होती. पण त्यांनाही भाजपाच्या उमदेवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.

    राज्यभरात मक्कल निधी मय्यमला 2.5 टक्के मते पडली. पक्षाला एवढा मोठा चेहरा असूनही निराशाजनक कामगिरीमुळे पक्षाचे उपाध्यक्ष आर. महेंद्रन, सरचिटणीस संतोष बाबू, पद्मप्रिया, एजी मौर्या, थंगावेल, उमादेवी, सेकर, सुरेश अय्यर आणि सीके कुमरावेल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

    या मोठ्या चेहऱ्यांनी पदे सोडल्यानंतर कमल हासनदेखील राजकारण सोडतील अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, एक व्हीडिओ शेअर करत हासन यांनी या सर्व अफवांचे खंडन केले आहे. तसेच एका निवडणुकीतील पराभवामुळे मी खचलेलो नाही, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात राहील, असे स्पष्ट केले.