संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन्… तो मित्र प्राण सोडेपर्यंत त्याच्यावर सपासप वार करत राहिला

सुरत : संशयाचं भूत डोक्यात शिरलं की माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याची प्रिचीती देणारा भयंकर प्रकार सुरत मध्ये घडला आहे. मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे. धारधार शस्त्राचा वापर करून त्याने त्याच्या मित्राचा खून केला.

धर्मेंद्र असं आरोपीचं नाव आहे. धर्मेंद्र याने नोकरी गमावली. मित्र राममुळेच आपली नोकरी गेल्याचा संशय त्याला होता. या किरकोळ संशयातून धर्मेंद्रने त्याच्या मित्राचाच खून केला.

धर्मेंद्रने त्याच्या हातातील शस्त्राने रामच्या डोक्यावर, पोटावर आणि पायावर ३० पेक्षा अधिकवेळा सपासप वार केले. यात रामचा जागीच मृत्यू झाला. या सर्व हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.