ऐ चुप्प,चुप्प,चुप्प… लाईव्ह डिबेट शोमध्ये मराठमोळ्या डॉ. लेलेंनी बाबा रामदेव यांची बोलती केली बंद

बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित एका टिव्ही डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे. त्यावरुन, डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प... चुप्प... असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली

    मुंबई – योग गुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी पुन्हा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्र्यांने झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. य़ावरुन आयोजित एका टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी  रामदेव यांना चांगलाच धारेवार घेतलं होतं.

    बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित एका टिव्ही डिबेट शोमध्ये डॉ. लेले जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांची बोलती बंद केली. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलायचे. त्यावरुन, डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प… चुप्प… असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली

    त्यानंतर, बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है.. मुझे चुप बैठानेवाले असे म्हणत उत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावर डॉ. लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळत आहे. तर, काहीजण डॉ. लेलेंना ट्रोलही करत आहे. पण, सोशल मीडियावर ते व्हायरल होत आहेत.

    कोण आहेत डॉ. जयेश लेले

    डॉक्टर लेले हे मूळ महाराष्ट्रातील मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. लेले यांनी शेठ जीएस. मेडिकल कॉलेजमधून १९७२ साली एमबीबीएसची पदवी घेतली असून सध्या ते इंडियन मेडिकल असोसिएशनेच सरचिटणीस आहेत. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. जयेश लेले हे बालरोगतज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आल आहे.