Thaman of mysterious fever in Uttar Pradesh; Sensation of 100 deaths

गूढ तापाचा सर्वाधिक प्रभाव फिरोजाबाद जिल्ह्यात दिसून येत आहे. फिरोजाबादमध्ये सर्वाधिक 70 मृत्यू झाले असून यातील 46 लहान मुले आहेत. तसेच मथुरा, कासगंज, आग्रा, एटा, मैनपुरी, नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, श्यामली तसेच सहारनपूरमध्येही मृत्यांची संख्या वाढत आहे. रुग्णांमध्ये तीव्र तापासोबत प्लेटलेट्सची संख्याही कमी होत असून डिहायड्रेशन, सांधेदुखी आणि खोकल्याचीही लक्षणे दिसून येत आहेत.

  लखनौ : उत्तरप्रदेशमध्ये गूढ तापाने थैमान घातले आहे. या तापामुळे आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून यात मुलांची संख्या जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उत्तरप्रदेशमधील 20 जिल्ह्यांमध्ये हा गूढ ताप पसरला असून दररोज शेकडो रुग्ण वाढत आहेत.

  गूढ तापाचा सर्वाधिक प्रभाव फिरोजाबाद जिल्ह्यात दिसून येत आहे. फिरोजाबादमध्ये सर्वाधिक 70 मृत्यू झाले असून यातील 46 लहान मुले आहेत. तसेच मथुरा, कासगंज, आग्रा, एटा, मैनपुरी, नोएडा, गाझियाबाद, मुझफ्फरनगर, श्यामली तसेच सहारनपूरमध्येही मृत्यांची संख्या वाढत आहे. रुग्णांमध्ये तीव्र तापासोबत प्लेटलेट्सची संख्याही कमी होत असून डिहायड्रेशन, सांधेदुखी आणि खोकल्याचीही लक्षणे दिसून येत आहेत.

  दरम्यान, फिरोजाबादमध्ये सर्वाधिक रुग्ण असून इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे 11 जणांचे एक पथक येथे पोहोचले असून स्थितीचा आढावा घेत आहे. संक्रमण पसरलेल्या भागातील लोकांच्या रक्ताचे नमुने हे पथक गोळा करत असून हा गूढ ताप आहे की कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आहे याचा शोध लावत आहेत.
  मुख्यमंत्र्यांनी घेतली रुग्णांची भेट

  दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद येथे येऊन रुग्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांना निर्देश दिले की, तत्काळ तपासणी करून हा ताप डेंग्यूचा आहे की दुसराच काही आजार आहे याचा शोध घ्या.

  मथुरेत ‘स्क्रब टायफस’ म्हटल्या जाणाऱ्या माइट जनित रिकेटिसयोसिसचे 29 रुग्ण आढळले असून तसेच गूढ तापामुळे 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे.