उत्तर प्रदेशात यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उलटली ; दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ४५ यात्रेकरूंना (passengers ) घेऊन निघालेली एक खासगी बस (Private Bus) उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी (Saturday) सकाळी उत्तर प्रदेशातील अलीगढच्या टप्पल ( Tappal area of Aligarh district) येथे घडली आहे.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) ४५ यात्रेकरूंना (passengers ) घेऊन निघालेली एक खासगी बस (Private Bus) उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी (Saturday) सकाळी उत्तर प्रदेशातील अलीगढच्या टप्पल ( Tappal area of Aligarh district) येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू (Three people died in the accident) झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरूवात केली. पोलीस आणि येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तसेच जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घनटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच, अपघातमधील जखमींना तत्काळ योग्य उपचारसुविधा दिल्या जाव्यात असे निर्देश दिले आहेत. कानपूरहून दिल्लीला निघालेली ही बस अलिगढमधील टप्पल भागात पोहचल्यावर या बसला अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.