Maharashtra trembled; Girl raped in Gondia-Pune bus

क्रूरपणाचा कळस गाठणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. एवढ्यावरच न थांबता नराधमांनी लाकूड घुसवून या तरुणीचे डोळेही फोडले आहेत.

बिहार : क्रूरपणाचा कळस गाठणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. एका १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. एवढ्यावरच न थांबता नराधमांनी लाकूड घुसवून या तरुणीचे डोळेही फोडले आहेत.

मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी मुक-बधीर असल्याचे तिच्या पीडित कुटुंबीयांनी सांगीतले. या बलात्कारात सहभागी असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंगळवारी दुपारी ती शेळ्यांसाठी चारा आणि जळणासाठी लाकडं आणायला जवळच्या मनहरपूर गावाच्या नदीकिनारी गेली होती. यावेळी या नरधमांनी तिच्यावर अत्याचार केला.

खूप उशीर झाला तरी घरी पोहचली नाही म्हणून तिला शोधण्यासाठी कुटुंबातील लोक बाहेर पडले, तेव्हा एका बागेत मुलगी नग्न स्थितीत बेशुद्ध अवस्थेत सापडली. कुटुंबीयांना तातडीने उमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला उपचारासाठी दाखल केले.

मुलीची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या एका डोळ्यात लाकूड घुसवून तिचा डोळा फोडण्यात आला आहे. तर दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी जाण्याचा धोका आहे. याशिवाय डोळ्यांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.