मुंबई-गोवा विमान सेवेत वाढ ; पर्यटन व्यवसायिकांना मोठा दिलासा

अनलॉक-४ (Unlock-4) मध्ये ६० टक्के विमाने सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. आहेत. इंडिगो, एअर एशिया, विस्तारा, स्पाइस जेट तसेच इतर खाजगी कंपन्यांनी विमान फेऱ्यांमध्ये वाढ करायला हवी. असे टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले.

 पणजी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Corona Virus) गेले सहा महिने गोव्याचे पर्यटन ठप्प होते. मात्र, काल मंगळवारी (Tuesday) स्पाइस जेटने मुंबई-गोवा (Mumbai-Goa) अशी आठवड्याचे सर्व दिवस दुपारची विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई-गोवा विमानसेवेत वाढ (Increase in Mumbai-Goa flights) झाली असून राज्यातील पर्यटक व्यावसायिक समाधान व्यक्त करीत आहेत.

स्पाइस जेटने (Spice Jet) जाहीर केल्यानुसार मुंबईहून येणारे विमान दुपारी १२.३० वाजता दाबोळी विमानतळावर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी परतीच्या प्रवासासाठी मुंबईला जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईहून विमानाने येणाऱ्या देशी पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. गोव्यात पर्यटन व्यवसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टूर अँड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की, खरेतर मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, दिल्लीहून पूर्वीसारखी नियमित विमानसेवा सुरू होणे पर्यटन व्यवसायिकांना अपेक्षित आहे. आम्ही नियमित विमानसेवेची प्रतीक्षा करीत आहोत.

अनलॉक-४ मध्ये ६० टक्के विमाने सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. आहेत. इंडिगो, एअर एशिया, विस्तारा, स्पाइस जेट तसेच इतर खाजगी कंपन्यांनी विमान फेऱ्यांमध्ये वाढ करायला हवी. गोव्याचे पर्यटन आता हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यवसायिक धरून आहेत परंतु त्यासाठी काही कालावधी निश्चित जाईल.स्वतःचे वाहन घेऊन येणारे देशी पर्यटक काही प्रमाणात येऊ लागले आहेत. रेल गाड्या, विमाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याशिवाय गोव्याचे पर्यटन बहरणार नाही. असे शहा म्हणाले.