मोबाईलचा अतिरेक ”सिंड्रोम” चा वाढला धोका

चंदीगड - कोरोना साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन केल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला ऑनलाईन

 चंदीगड – कोरोना साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन केल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला ऑनलाईन काम करण्याच्या प्रकारामुळे डोळ्याच्या आजाराचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. डोळ्याचा सिंड्रोम आजाराच्या रुग्णात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. सिंड्रोम आजारात डोळे कोरडे होऊन कमकुवत होण्याची लक्षणे आढळत असल्याचे दिसून आले आहे. चंदीगडमध्ये ड्राय आई सिंड्रोममुळे दृष्टी जाण्याचे प्रमाण दुप्पट झाल्याचे समोर आले आहे. डोळ्यातील कोरडेपणा असलेल्या रुग्णांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. याशिवाय डोळ्याच्या थकव्याचे प्रमाणही वाढले. कॉर्निया सेंटर येथील माजी वरिष्ठ प्राध्यापक आणि नेत्रतज्ञ डॉ. अशोक शर्मा यांनी ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. मोबाईलचा वापर अधिक होत आहे.