गृहमंत्री कडाडले; जम्मूत अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या १६८ रोहिंग्यांची तुरुंगात रवानगी 

मागील अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. हरयाणाच्या मेवातमध्येही रोहिंग्यांची उपस्थिती दिसून येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणे आहे.

    चंदीगड : भारत काही धर्मशाळा नव्हे, जिथे कुणीही येऊन बस्तान मांडावे अशा शब्दात हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी तोफ डागली. ते राज्यात आश्रय घेणाऱ्या रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींबद्दल बोलत होते. दरम्यान राज्यातील रोहिंग्या मुस्लिमांची माहिती एकत्र केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. उल्लेखनीय असे की, जम्मूत अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या १६८ रोहिंग्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

    मागील अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्या शरणार्थींनी जम्मू, हैदराबाद, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानीत आश्रय घेतला आहे. हरयाणाच्या मेवातमध्येही रोहिंग्यांची उपस्थिती दिसून येत असल्याचं प्रशासनाचं म्हणणे आहे.

    काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये दोन रोहिंग्या मुस्लीम व्यक्तींविरोधात बनावट पासपोर्ट मिळवून फसवणुकीचा प्रकार दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूत राहणाऱ्या रोहिंग्या समुदायातील लोकांची ओळख पटवली जात आहे.

    याच दरम्यान दोन रोहिंग्या व्यक्तींकडे बनावट पासपोर्ट आढळून आला होता. रहमान आणि गफूर नावाच्या या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.