Indian coast guard

तटरक्षक दलाच्या(Indian coast guard action on shrilankan boat वरळीत मुख्यालय असलेल्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरूवारी मोठी कारवाई करुन तिन्ही बोटींसह त्यावरील १० खलाशांच्या मुसक्या आवळत घातपाताचा मोठा कट उधळला. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय बेटावर ही थरारक कारवाई करण्यात आली.

    मुंबई: एक श्रीलंकन(shrilankan boats) मच्छिमार बोट तब्बल ४९०० कोटींचे अंमली पदार्थ, ए के ४७ रायफली आणि १ हजार जिवंत काडतुसे घेऊन भारतीय किनारपट्टीवर वेगाने येत होती. ती बोट एकटी नव्हती़ आणखी दोन बोटी तिला संरक्षण पुरवत होत्या. पण तटरक्षक दलाच्या(Indian coast guard action on shrilankan boat वरळीत मुख्यालय असलेल्या पश्चिम ताफ्यातील युद्धनौकेने अरबी समुद्रात गुरूवारी मोठी कारवाई करुन तिन्ही बोटींसह त्यावरील १० खलाशांच्या मुसक्या आवळत घातपाताचा मोठा कट उधळला. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय बेटावर ही थरारक कारवाई करण्यात आली.

    तटरक्षक दलाची कारवाई
    तटरक्षक दलाची गस्ती नौका गस्त घालत असताना तीन मच्छिमार नौका संशयास्पद स्थितीत दिसून आल्याची माहिती मिळाली. यामुळे दलाच्या गस्ती नौकांनी तात्काळ हवाई टेहळणी विभागाला माहिती दिली. टेहळणी विमानाने आकाशात घिरट्या घालून संबंधित नौकांबद्दल अधिक माहिती तसेच नेमके ठिकाण गस्ती नौकेला कळवले. त्यानुसार गस्ती नौकेने या तिन्ही मच्छिमार नौकांना घेराव घातला.

    ए.के.४७ रायफली, काडतुसे जप्त
    ‘रवीहंसी’ या बोटीत अंमली पदार्थांचा कोट्यवधींचा साठा, ए. के. ४७ रायफली आणि जीवंत काडतुसे भरलेली होती़ तटरक्षक दलाने मिनी कमांडो मोहीम राबवत तीनही बोटींवरील खलांशाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सर्व साधनसामग्री हस्तगत केली़