pocket ventilator

कोलकाताच्या डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी या शास्त्रज्ञानं(Kolkata Scientist invented pocket ventilator) व्हेंटिलेटरच्या कमतरतेच्या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी पॉकेट व्हेंटिलेटरची (Pocket Ventilator) निर्मिती केली आहे.

  कोरोना काळात (Corona)आरोग्य सुविधा(Medical Facility) अपुऱ्या पडत आहेत. कुठे बेड मिळत नाहीत तर कुठे रेमडेसिवीर इंजेक्शन.व्हेंटिलेटर बेडचीही कमतरता आहे. कोलकाताच्या डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी या शास्त्रज्ञानं(Kolkata Scientist invented pocket ventilator) व्हेंटिलेटरच्या कमतरतेच्या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी पॉकेट व्हेंटिलेटरची (Pocket Ventilator) निर्मिती केली आहे.

  डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी इंजिनिअर असून ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात. आता त्यांनी बॅटरीवर चालणारा एक पॉकेट व्हेंटिलेटर तयार केला आहे. यामुळे रुग्णाला तात्काळ उपचार मिळू शकतो. हे व्हेंटिलेटर वापरायला एकदम सोप आणि स्वस्त आहे. एखाद्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर याचा फायदा होऊ शकतो.

  डॉ. मुखर्जी म्हणतात की, कोरोना संकटाच्या काळात त्यांची ऑक्सिजन लेवल ८८ वर गेली होती. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात घेऊन जात होते. मी या संकटातून बाहेर आलो. मात्र यानंतर त्यांच्या डोक्यात रुग्णांची मदत करण्याासाठी एक आयडिया आली. त्यांनी २० दिवसांमध्ये पॉकेट व्हेंटिलेटर तयार केलं.त्यांनी बनवलेल्या डिवाइसमध्ये दोन यूनिट आहेत, पावर आणि व्हेंटिलेटर. हे दोन्ही मास्कला जोडलेले आहेत.

  एक बटण दाबताच व्हेंटिलेटर काम करणं सुरू करतं आणि स्वच्छ हवा रुग्णापर्यंत पोहोचवतं. मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या रुग्णाला कोरोना असल्यास यूवी फिल्टर व्हायरस मारण्यास मदत करतो आणि साफ हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो.
  या व्हेंटिलेटरच्या मदतीनं व्हायरसचा प्रसार कमी होईल. रुग्ण आणि डॉक्टरांना दिलासा मिळेल.

  मुखर्जी यांनी असाही दावा केला आहे की, ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढत असताना हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. विशेष बाब म्हणजे या पॉकेट व्हेंटिलेटरमध्ये एका कंट्रोल नॉबही आहे. याच्या मदतीनं हवेचा फ्लो कंट्रोल करता येऊ शकतो. याचं वजन केवळ २५० ग्रॅम असून हे बॅटरीवर चालतं. एकदा चार्ज केल्यानंतर हे आठ तासांपर्यंत काम करू शकतं. फोनच्या चार्जरनंही हे चार्ज केलं जाऊ शकतं. हा व्हेंटिलेटरचा नवा पर्याय खूप उपयुक्त ठरणार आहे.