India's veteran sprinter admitted to Milkha Singh Hospital; Oxygen levels decreased

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खासिंग यांना मोहालीमधील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    चंदीगड : भारताचे दिग्गज धावपटू मिल्खासिंग यांना मोहालीमधील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    फ्लाइंग शिख अशी मिल्खा सिंग यांची ओळख आहे. मिल्खा यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली होती. त्यानंतर ते घरातच क्वारंटाईन होते.

    सोमवारी अचानक त्यांची तब्येत खालावली, त्यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी खूप कमी असल्याचे म्हटले जात आहे.