murder by firing

पाटण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरची(indigo manager dead) गोळ्या घालून हत्या(murder in patna) करण्यात आली. रुपेश कुमार असं या मॅनेजरचं नाव आहे.

पाटण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरची(indigo manager dead) गोळ्या घालून हत्या(murder in patna) करण्यात आली. रुपेश कुमार असं या मॅनेजरचं नाव आहे. कॉलनीच्या गेटवर गाडी आलेली असताना आरोपींनी गोळीबार केल्याने रुपेश कुमार जखमी झाला.पाटणातील पुनाईचाक भागातील कुसुम विलास अपार्टमेंट येथे रात्री ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरपोर्ट मॅनेजर रुपेश कुमार विमानतळावरून घरी येत होते. त्यांची गाडी कॉलनीच्या गेटजवळ आली आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कुमार यांच्यावर तब्बल सहा राऊंड फायर केल्यावर आरोपी फरार झाले. या हल्ल्यात कुमार गंभीर जखमी झाले.

रुपेश कुमार यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.