कशी सत्ता स्थापन करता तेच बघतो; फारूख अब्दुल्लांचा भाजपाला इशारा

जम्मू काश्मिरात आगामी निवडणुकीत भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री असेल असा संकल्प सोडताच नॅशनल काँफ्रेन्सची चलबिचल सुरू झाली आहे. ही चलबिचल पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या बोलण्यातून स्पष्ट झळकली. ते कशी सत्ता स्थापन करतात तेच बघतो असे ते म्हणाले.

    श्रीनगर (Srinagar). जम्मू काश्मिरात आगामी निवडणुकीत भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री असेल असा संकल्प सोडताच नॅशनल काँफ्रेन्सची चलबिचल सुरू झाली आहे. ही चलबिचल पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या बोलण्यातून स्पष्ट झळकली. ते कशी सत्ता स्थापन करतात तेच बघतो असे ते म्हणाले.

    फारूख अस्वस्थ होण्यामागचे कारण म्हणजे, नुकत्याच झालेल्या जिल्हा विकास परिषदेत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना फारूख यांनी या मुद्यावरून भाजपावर निशाणा साधला. ते म्हणतात, पुढील सरकार आम्ही स्थापन करू. मी पण पाहतो ते कसे स्थापन करतात? आकाशातून येऊन बनवणार का? आम्ही येथे उभे आहोत.

    आम्हाला कसे हटविणार?
    इतिहासही साक्षीदार आहे की नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू काश्मिरसाठी नेहमीच बलिदान दिले आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी लोकांमध्ये धर्माच्या नावावर द्वेष पसरविण्याचे काम भाजपा करीत आहे. निवडणुकीवेळी आम्हाला पाकिस्तानी संबोधले जाते आणि निवडणुकीनंतर भारतीय. दहशतवाद्यांसमोर आम्ही कधीच गुडघे टेकले नाहीत.

    फारूख अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे पालन करा रोहिंग्या मुस्लींविरोधात सरकारतर्फे सुरू असलेल्या कारवाईवरही अब्दुल्लांनी तोफ डागली. रोहिंग्यांच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे पालन करावे असा सल्लाही त्यांनी दिला. भारत सरकारच्या परवानगीविना देशात कोणताही व्यक्ती राहू शकत नाही असेही फारूख अब्दुल्ला म्हणाले.