अखेरीस प्रेमाचाच झाला विजय अन् फरहा झाली माही

नौचंदी (Nauchandi) ठाणे परिसरात शास्त्रीनगर एल ब्लॉक घराजवळ हरिओम मदान (Hariom Madan) यांचे मिठाईचे दुकान (Confectionery shop) आहे. या दुकानामध्ये हरिओमचा मुलगा नमन (Naman) कायम बसायचा. दरम्यान, याच दुकानात फरहा (Farha) सुद्धा आल्याने दोघांमध्ये प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या. परंतु तरूणीच्या घरात त्यांच्या प्रेमाविषयी झळ लागल्यामुळे दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला.

मेरठ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जनपद (Meerut district) येथील एका हिंदू तरूणासोबत प्रेमविवाह (Love Marriage) करणाऱ्या तरूणीचा अखेर विजय झाला आहे. तरूणीला पोलिसांनी (Police) कोर्टात हजर केल्यानंतर तिने स्वतःला प्रौढ म्हणून वर्णन करताना तिने आपल्या प्रियकराशी लग्न (Marriage) केल्याचा पुरावा सादर केला. त्यानंतर कोर्टाने (Court) या तरूणीला तिच्या पतीसोबत घरी जाण्याचे आदेश दिले. तसेच तरूणाच्या कुटुंबियांनी देखील तरूणीला स्वीकारलं आहे. आता कुटुंबियातील सदस्य त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

मिठाईच्या दुकानात झालं प्रेम

नौचंदी ठाणे परिसरात शास्त्रीनगर एल ब्लॉक घराजवळ हरिओम मदान यांचे मिठाईचे दुकान आहे. या दुकानामध्ये हरिओमचा मुलगा नमन कायम बसायचा. दरम्यान, याच दुकानात फरहा सुद्धा आल्याने दोघांमध्ये प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या. परंतु तरूणीच्या घरात त्यांच्या प्रेमाविषयी झळ लागल्यामुळे दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १३ डिसेंबरला फरहा आणि नमन दोघेही घरातून फरार झाले.

हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यात घातला गोंधळ

दोन समुदायाशी जोडल्या गेलेल्या पंथांमुळे दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली. तरूणीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात नमनवर तिचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नमनच्या बाजूने पोलीस ठाण्यात एकच गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी १६ डिसेंबरला दोघांनाही ऋषिकेश मंदिरातून ताब्यात घेतलं.

पतीच्या घरी जाण्यासाठी मागितली कोर्टात परवानगी

नमन आणि फरहा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मेरठला घेऊन गेले. शुक्रवारी साक्षीदार म्हणून फरहाला पोलिसांनी कोर्टात हाजीर केले. त्यानंतर फरहाने तिचे वयवर्ष २३ असून ती तरूणी असल्याचे सांगितले. तसेच मी माझ्या मर्जीने माझा प्रियकर नमन याच्याशी पळून जाऊन ऋषिकेश येथील एका मंदिरात लग्न केले. लग्न झाल्यानंतर मी माझे नाव माही असे ठवल्याचे फरहाने कोर्टात सांगितले. फरहा उर्फ माहीने त्यांच्या लग्नाचे संपूर्ण कागदपत्र आणि पुरावे कोर्टात सादर केले आणि पतीसोबत घरी जाण्याची अनुमती मागितली. कोर्टाने तिला सासरी जाण्यास होकार दिला असून लग्नानंतर दोघेही आनंदीत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.