आजपासून जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ; अन्य वाहनाला यात्रेत सहभागी होण्याची परवानगी नाही

ओडिशा इथल्या प्रसिद्ध असलेल्या श्री भगवान जगन्नाथाच्या तीर्थयात्रेला (pilgrimage of Lord Jagannath) आजपासून प्रारंभ होत आहे. रथयात्रा सुरळीत पार पडावी म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था (Strict security) ठेवण्यात आली आहे.

  भुवनेश्वर (Bhubaneshwar). ओडिशा इथल्या प्रसिद्ध असलेल्या श्री भगवान जगन्नाथाच्या तीर्थयात्रेला (pilgrimage of Lord Jagannath) आजपासून प्रारंभ होत आहे. रथयात्रा सुरळीत पार पडावी म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था (Strict security) ठेवण्यात आली आहे. जगन्नाथ मंदिरातून (Jagannath Temple) दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीया तिथीला जगन्नाथ रथ यात्रा (Jagannath Rath Yatra) निघते.

  आषाढ शुक्ल द्वितीयाची तारीख १२ जुलै सोमवारपासून निघत आहे. यात्रेचा वार्षिक उत्सव नऊ दिवस चालतो. रथयात्रेच्या पहिल्या दिवशी रथ पाच किलोमीटर ओढला जातो आणि पुरी येथील गुंडीच्या मंदिरात येऊन थांबतो, जे मंदिर कृष्णाच्या मावशीचे मंदिर आहे.

  काय आहे प्रथा?
  हिंदू धर्मातील चार धाम मध्ये जगन्नाथ पुरीचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णु रामेश्वरममध्ये स्नान, द्वारकेत शयन, बद्रीनाथमध्ये ध्यान आणि पुरीमध्ये भोजन करतात. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याशिवाय चारधाम यात्रा पूर्ण मानली जात नाही.


  आषाढ शुक्ल द्वितीया पासून जगन्नाथ पुरी रथ यात्रा प्रारंभ होते. रथयात्रेने मध्ये बलराम यांच्या रथाला ‘ताळध्वज’ म्हणतात, देवी सुभद्रा यांच्या रथाला ‘दर्पदलन’ तर भगवान जगन्नाथ यांच्या रथाला ‘नंदीघोष’ किंवा ‘गरुडध्वज’ म्हणतात. हा रथ सर्वात मागे राहतो. या तीनही रथांची उंची, चाके आणि आकृती वेगवेगळी असते.


  भगवान जगन्नाथ यांचा रथ गरुडध्वज
  या रथाला सोळा चाके, लाकडाचे तुकडे 832 नग, उंची 13.5 मीटर, लांबी व रुंदी 34 फूट 6 इंच बाय 34 फुट 6 इंच, लाल व पिवळ्या रंगाचे कापडी अच्छादन, संरक्षण – गरुड, रथाचे नाव- दरुका, ध्वजाचे नाव- त्रिलोक्य मोहिनी, दोराचे नाव- सारवुजडा.


  बलभद्रांचा रथ- तळध्वज
  रथाला चाके- 14, लाकडाचे तुकडे 763 नग, रथाची उंची 13.2 मीटर, लांबी व रुंदी- 33 फूट बाय 33 फूट, कापडी आच्छादन- लाल, निळसर हिरवा, संरक्षण- वासुदेव, चालकाचे नाव- आताली, ध्वज- उन्नानी, दोराचे नाव- बसुकी.

  देवी सुभद्रा यांचा रथ – दर्पदालन/पद्मध्वज
  रथाला चाके -12, लाकडाचे तुकडे 593 नग, रथाची उंची- 12.9 मीटर, लांबी व रुंदी- 31 फूट 6 इंच बाय 31 फूट 6 इंच, कापडी आच्छादन- लाल व काळा, संरक्षण- जयदुर्ग, सारथी- अर्जुन, ध्वज- नंदबिका, दोराचे नाव- स्वयंमुद्रा.


  दरम्यान, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर या रथ यात्रेत केवळ तीन रथ आणि दोन इतर गाड्या सहभागी होतील. याशिवाय कोणत्याही वाहनाला यात्रेत सहभागी होण्याची परवानगी नाही. तसंच यंदा गायन मंडळ, आखाडे, हत्ती किंवा सजलेले ट्रक अशा प्रकारच्या लवाजम्याला परवानगी नाकारण्यात आलीय.