Falling ill after Panchamrit bath, devotees do not have darshan for 15 days Lord Jagannath also became a quarantine

कोरोना साथीच्या काळात अहमदाबादमधील भगवान जगन्नाथ यांची 144 वी पारंपरिक रथ यात्रा निघणार आहे. यावेळी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात्रेत केवळ 3 रथ आणि 2 वाहने असतील. 19 किमी मार्गासाठी रथ यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसाद वाटप होणार नाही.

    अहमदाबाद : कोरोना साथीच्या काळात अहमदाबादमधील भगवान जगन्नाथ यांची 144 वी पारंपरिक रथ यात्रा निघणार आहे. यावेळी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात्रेत केवळ 3 रथ आणि 2 वाहने असतील. 19 किमी मार्गासाठी रथ यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसाद वाटप होणार नाही.

    गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी याबाबत माहिती दिली. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलते पालन करत रथयात्रा आखाडा, भजन मंडळाशिवाय दुपारपर्यंत निघेल. लोकांचा भगवान जगन्नाथांवर खूप श्रद्धा आणि विश्वास असल्याचे जडेजा म्हणाले. कोरोनामुळे गेल्यावर्षी रथयात्रा निघू शकली नाही.