Jaipur Crime News : मित्राकडून 500 रुपये घेतले आणि त्या बदल्यात दिली बायकोेवर बलात्कार करण्याची परमिशन

    जयपूर : गरजवंताला अकल्ल नसते पण गरजवंताला लाज ही नसते याची प्रचिती देणारी धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. मित्राकडून 500 रुपये घेवून त्या बदल्यात या एका व्यक्तीने मित्राला बायकोेवर बलात्कार करण्याची परमिशन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    पैशांची गरज असल्यामुळे या नराधम पतीनं आपल्या मित्राकडून 500 रुपये घेतले होते. मात्र, त्या मोबदल्यात त्याने आपल्या पत्नीचा ताबा पैसे देमाऱ्या मित्राकडे दिला तसेच त्याला तिच्यावर जबरदस्ती करण्याची परवानगीही दिली.

    या नंतर या मित्राने महिलेला निर्जन स्थळी नेत तिच्यावर बजरदस्तीने अत्याचार केला. या महिलेने तात्काळ पोलिस ठाणे गाठत पती आणि अत्याचार करणाऱ्या पतीच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली. या नंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. माणुसकी आणि नात्यांना काळीमा फासणारी या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.