मतदानाचा प्रतिकात्मक फोटो
मतदानाचा प्रतिकात्मक फोटो

जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी डीडीसीसाठी होत असलेल्या पाचव्या टप्प्याच्या मतदानात घोळ झाल्याचा आरोप केला. सुरक्षा दलाने शोपियातील मातृबाग येथे घेराव घातला आणि परिसरात दहशतवादी असल्याची माहिती देत लोकांना मतदानासाठी घराबाहेच पडू दिले नाही असा आरोप केला. सत्तेचा गैरवाप करीत सशस्त्र दलांचा उपयोग निवडणुकीत घोळ करणे आणि एकाच पक्षाला मतदान व्हावे यासाठीच हा प्रकार करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

  • मेहेबुबा मुफ्ती यांचा खळबळजनक आरोप

श्रीनगर (Shrinagar).  जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी डीडीसीसाठी होत असलेल्या पाचव्या टप्प्याच्या मतदानात घोळ झाल्याचा आरोप केला. सुरक्षा दलाने शोपियातील मातृबाग येथे घेराव घातला आणि परिसरात दहशतवादी असल्याची माहिती देत लोकांना मतदानासाठी घराबाहेच पडू दिले नाही असा आरोप केला. सत्तेचा गैरवाप करीत सशस्त्र दलांचा उपयोग निवडणुकीत घोळ करणे आणि एकाच पक्षाला मतदान व्हावे यासाठीच हा प्रकार करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी केले होते आरोप

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहेबूबा मुफ्ती

यापूर्वीही मुफ्तींनी सरकारी अधिकाऱ्यांना त्यांना तिसऱ्यांदा नजरकैदेत ठेवले होते असा आरोप केला. सुरक्षेच्या कारणावरून मला नजरकैदेत ठेवले जात असेल तर भाजपा मंत्र्यांना काश्मिरात स्वतंत्ररित्या प्रचार का करू दिला जात आहे असा सवालही त्यांनी केला होता.

मतदान शांततेत
गुरुवारी झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत मतदान शांततेत पार पडले. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 37 जागांसाठी मतदान झाले. यात काश्मिर विभागातील 17 आणि जम्मू भागातील 20 जागांचा समावेश आहे. सकाळी कडाक्याची थंडी असल्याने मतदारांनी घराबाहेर पाऊल टाकले नाही नंतर मात्र त्यांनी हिरीरीने मतदानात भाग घेतला. काश्मिर विभागात 17 जागांवर 30 महिलांसह एकूण 155 उमेदवार तर जम्मू वभागात 20 जागांसाठी 40 महिलांसह 144 उमेदवार रिंगणात होते.