jammu and kashmir Lieutenant governor manoj sinha approves use of raj bhavans helicopter for patients
या उपराज्यपालांनी घेतला असा निर्णय की, तुम्हीही गर्वाने म्हणाल...

काश्मीरमध्ये अजूनही दुर्गम भागातून जलदपणे शहरात येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नाही. फक्त दारिद्ररेषेखालच्या गरीब नागरिकांसाठी ही सेवा पुरवण्यात जाणार आहे.

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) उप राज्यपाल (Deputy Governor) मनोज सिन्हा (manoj sinha) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या दुर्गम भागात राहणाऱ्या रुग्णांसाठी राजभवनाचं (rajbhavan) हेलिकॉप्टर (helicopter) वापरासाठी देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत (emergency) हे हेलिकॉप्टर रुग्णांना नि:शुल्क (free) उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधल्या दुर्गम भागतल्या रुग्णांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला आहे. काश्मीरमध्ये अजूनही दुर्गम भागातून जलदपणे शहरात येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होतात. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.

फक्त दारिद्ररेषेखालच्या गरीब नागरिकांसाठी ही सेवा पुरवली जाणार आहे. राज्यात हेलिकॉप्टर सेवा कमी दरात उपलब्ध आहे. मात्र ती सुद्धा ज्यांना परवडत नाही अशाच नागरिकांना ही सेवा दिली जाणार आहे.

 

मनोज सिन्हा यांची काही महिन्यांपूर्वीच राज्यात नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला. राज्याला खास दर्जा देणारं कलम ३७० हटविल्यानंतर राज्यात वेगळं वातावरण निर्माण झालं आहे.

सध्या राज्याला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे. ३७०वं कलम हटविताना केंद्र सरकारने विकासाचं (developement) आश्वासन दिलं होतं. त्यामुळे सिन्हा यांनी आता अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. राज्यातल्या स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ देण्यासाठी नुकसाच राज्याने काही Online पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत करारही केला आहे.