नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट दहशतवादी रचत असल्याचे यावरून उघडकीस आले आहे. पोलिसांना या दोन दहशवाद्यांसदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी श्रीनगर रोडवर नाकाबंदी केली. पोलिसांनी श्रीनगर मार्गावरील वाहनांची तपासणी सुरू केली असता काही वेळातच पोलिसांना हवे असलेल्या संशयितांची अल्टो कार तपासणी नाक्यावर आली. मात्र, नाका चूकवून फरार होण्याची तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. भारताचे दोन जवान जखमी झाले आहेत.
कानिगम परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरू केली होती. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला चढवला असता, त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी ठार झाले. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांची वृत्तलिहिस्तोवर ओळख पटली नव्हती. या चकमकीत भारताचे दोन जवानदेखील जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
शरण येण्यास दिला नकार
सुरक्षा दलाने सर्वप्रथम दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी नकार दिला. शिवाय गोळीबारही केला. अखेर जवानांनाही गोळीबार करावा लागला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
शस्त्रास्त्रांसह दोन दहशतवाद्यांना अटक
जम्मूमध्ये टीआरएफ (द रेजिस्टेंस फ्रंट) संघटनेशी संबंधित असलेल्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. जम्मू पोलिसांनी ही कारवाई केली. रईस अहमद दार, (काझीगुंड) आणि सब्जार अहमद शेख उर्फ अश्मुजी(कुलगाम)अशी या दोन दोघा दहशतवाद्यांची नावे आहेत. ते कारने श्रीनगरकडे जात होते. त्यावेळी नारवल येथील बाह्यमार्गाजवळ पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या पथकाने त्यांना अटक केली.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट दहशतवादी रचत असल्याचे यावरून उघडकीस आले आहे. पोलिसांना या दोन दहशवाद्यांसदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी श्रीनगर रोडवर नाकाबंदी केली. पोलिसांनी श्रीनगर मार्गावरील वाहनांची तपासणी सुरू केली असता काही वेळातच पोलिसांना हवे असलेल्या संशयितांची अल्टो कार तपासणी नाक्यावर आली. मात्र, नाका चूकवून फरार होण्याची तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या.
दोघांकडे असलेल्या एका बँगमध्ये एके रायफल दोन मॅगेझिन, ६० राऊंड आणि पिस्तुल आणि दोन मॅगझिन सह १५ गोळ्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करत दोघांनाही अटक केली आहे. बहू फोर्ट पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामधील दार हा दहशतवादी कारवायामध्ये सक्रीय आहे. त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. तो टीआरएफसाठी काम करतो.
Jammu and Kashmir: Visuals from Kanigam area of Shopian where two terrorists have been neutralised in an encounter with security forces.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ezoHNyU8iM
— ANI (@ANI) December 26, 2020