jharkhand mla protest

विधानभवनात नमाजासाठी खोली देणे(Allotment Of Room For Namaz) असंवैधानिक असल्याचे भाजपाने म्हटले आहे.अधिवेशनाच्या आधी भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janata Party)विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांवर बसून हनुमान चालीसा आणि “हरे राम” चा पठण करत आंदोलन केले.

    आज झारखंड(Jharkhand) विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी दिलेल्या विशेष खोलीच्या(BJp Mla`s Protest Against Allotment OF Room For Namaz) वादावरून गोंधळ झाला. विधानभवनात नमाजासाठी खोली देणे असंवैधानिक असल्याचे भाजपाने म्हटले आहे.अधिवेशनाच्या आधी भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janata Party)विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्यांवर बसून हनुमान चालीसा आणि “हरे राम” चा पठण करत आंदोलन केले. तसेच कार्यवाही दरम्यान सभागृहात जय श्रीराम म्हणत घोषणा दिल्या.

    सभागृहात भाजपा सदस्यांनी नमाज अदा करण्यासाठी विशेष खोलीचा आदेश मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी भानु प्रताप शाही यांच्यासह इतर भाजप सदस्यांना “त्यांच्या जागांवर परत जा” असे आवाहन केले. “तुम्ही चांगले सदस्य आहात. कृपया अध्यक्षांना सहकार्य करा”, असे ते म्हणाले.

    पुढे गोंधळ सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२.४५ पर्यंत तहकूब केले होते. या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी रविवारी मुख्यमंत्री सोरेन आणि सभापतींचे पुतळे देखील जाळले होते. सभापतींनी नमाज अदा करण्यासाठी खोली क्रमांकाची विशेष खोली (TW ३४८) दिली आहे. त्यामुळे भाजपाने याला  विरोध केला आहे. तसेच भाजपने विधानसभा परिसरात हनुमान मंदिर आणि इतर धर्मांची प्रार्थनास्थळे बांधण्याची मागणी देखील केली आहे.