झारखंडमध्ये बस आणि कारची जोरदार धडक, बसने घेतला पेट ; ५ जणांचा मृत्यू

बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. 

    झारखंड : झारखंडमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना झारखंडमधील रामगड येथे घडली. भीषण अपघातानंतर बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. भरधाव बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. त्यानंतर घटनास्थळावर तात्काळ बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

    बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा या कारपर्यंत पोहोचल्या आणि कारमधील पाचही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.

    घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे.