जितन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले…

भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा उभारी घेऊल, असा मला विश्वास आहे. आजही आपल्याकडे एक मजबूत फळी आहे, ज्याचा वापर योग्य ताकदीने केल्यास त्यांचा मोठा फायदा होईल, असेही देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    मुंबई – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना जितिन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपामधील प्रवेशानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन, पक्षातील इतर सहकाऱ्यांप्रति इच्छा व्यक्त केली. पक्षातील इतर सहकारी, मित्र आणि अनेक वजनदार सहकाऱ्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.