आता वाटते तेवढी काळजी तेव्हा वाटली असती, तर चित्र वेगळं असतं, ज्योतिरादित्य सिंदियांचा राहुल गांधींना टोला

राहुल गांधी सध्या आपली जेवढी काळजी करत आहेत, तेवढी काळजी पक्षात असताना घेतली असती, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असा टोला भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी लगावलाय. भाजपमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया मागच्या बाकावर ढकलले जात असल्याच्या टीकेला ज्योतिरादित्य यांनी उत्तर दिलंय. यानिमित्तानं राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यात कलगीतुरा रंगत असल्याचं चित्र निर्माण झालंय. 

    भाजप खासदार ज्योतिरादित्य सिंदिया जर काँग्रेसमध्ये राहिले असते, तर ते लवकरच मुख्यमंत्री झाले असते. आता भाजपमध्ये ते हळूहळू पाठिमागील बाकांवर ढकलले जात असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला ज्योतिरादित्य सिंदिया यांनी उत्तर दिलंय.

    राहुल गांधी सध्या आपली जेवढी काळजी करत आहेत, तेवढी काळजी पक्षात असताना घेतली असती, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असा टोला भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी लगावलाय. भाजपमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया मागच्या बाकावर ढकलले जात असल्याच्या टीकेला ज्योतिरादित्य यांनी उत्तर दिलंय. यानिमित्तानं राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यात कलगीतुरा रंगत असल्याचं चित्र निर्माण झालंय.

    काँग्रेस पक्षाची रचना लोकशाहीच्या तत्त्वावर आधारित असून तुम्ही संघटना जेवढी मजबूत करता तेवढेच तुम्हीदेखील मजबूत होत जाता, असं राहुल गांधींनी म्हटलंय. ज्योतिरादित्य कामदेखील चांगलं करत होते. लवकरच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल, असं मी त्यांना म्हटलं होतं. मात्र त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्रीपद दूरच, ते भाजपमध्ये मागच्या बाकांवर ढकलले गेल्याचं निरीक्षण राहुल गांधी पक्षकार्यकर्त्यांसमोर मांडलं.

    ज्योतिरादित्य सिंदिया भाजपात असताना कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. त्यासाठी त्यांना काँग्रेसमध्येच परत यावं लागेल, असं विधान करत त्यांनी सिंदिया यांना पक्षात परत येण्याचं एकप्रकारे आवाहनदेखील केलं. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपात प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला होता. मात्र भाजपमध्येदेखील त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. भविष्यात ज्योतिरादित्य पुन्हा काँग्रेस प्रवेश करणार का, अशी चर्चा यानिमित्तानं पुन्हा सुरू झालीय.