ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं पाऊल, ८ नव्या हवाईमार्गांना मंजुरी

हवाई प्रवास स्वस्त करणं आणि देशातील कानाकोपऱ्यातील शहरांना हवाई मार्गांनी जोडण्यासाठी UDAN ही योजना सुरू करण्यात आली होती. यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमधील नागरिकांना दिलासा देत नव्या मार्गांची घोषणा त्यांच्या ट्विटर हँडलवरुन केली आहे.

    छोट्या शहरांना हवाई मार्गानं जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या UDAN योजनेअंतर्गत ८ नव्या हवाईमार्गांची घोषणा ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे. हे सर्व हवाईमार्ग मध्य प्रदेशातील शहरांना इतर राज्यांशी जोडणारे आहेत. येत्या १६ जुलैपासून नव्या मार्गांवर विमान प्रवास सुरू होणार आहे.

    ग्वाल्हेर-अहमदाबाद, सूरत-जबलपूर, ग्वाल्हेर-पुणे, ग्वाल्हेर-मुंबई या नव्या हवाईमार्गांचा यात समावेश आहे. हवाई प्रवास स्वस्त करणं आणि देशातील कानाकोपऱ्यातील शहरांना हवाई मार्गांनी जोडण्यासाठी UDAN ही योजना सुरू करण्यात आली होती. यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशमधील नागरिकांना दिलासा देत नव्या मार्गांची घोषणा त्यांच्या ट्विटर हँडलवरुन केली आहे.