भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मंत्री सरताज सिंह
भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मंत्री सरताज सिंह

जवळपास २५ महिन्यांपूर्वी भाजपाचे कमळ सोडून काँग्रेसचा हात धरणारे माजी मंत्री सरताज सिंह यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. सरताज सिंह यांनी शेतकरी संमेलनात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात घरवापसी केली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिवनी मालवा विधानसभा मतदारसंघातून तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केला होता व काँग्रेसमध्ये गेले होते. दरम्यान सरताज सिंह ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विनंतीवरूनच काँग्रेसमध्ये गेले होते व आताही त्यांच्याच विनंतीवरून भाजपात घरवापसी केली अशी चर्चा आहे.

भोपाळ (Bhopal). जवळपास २५ महिन्यांपूर्वी भाजपाचे कमळ सोडून काँग्रेसचा हात धरणारे माजी मंत्री सरताज सिंह यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. सरताज सिंह यांनी शेतकरी संमेलनात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात घरवापसी केली. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिवनी मालवा विधानसभा मतदारसंघातून तिकिट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम केला होता व काँग्रेसमध्ये गेले होते. दरम्यान सरताज सिंह ज्योतिरादित्य शिंदे यांच्या विनंतीवरूनच काँग्रेसमध्ये गेले होते व आताही त्यांच्याच विनंतीवरून भाजपात घरवापसी केली अशी चर्चा आहे.

भोपाळमध्ये झाली होती चर्चा
यापूर्वी सरताज सिंह यांनी ते भाजपात जाणार असल्याची घोषणा केली होती. शिंदे यांच्या भोपाळ दौऱ्यात त्यांनी समर्थकांसह भेटही घेतली होती. त्यानंतरच त्यांच्या घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. उल्लेखनीय असे की सरताज सिंह भाजपाचे 5 वेळा खासदार, 2 वेळा आमदार राहिले आहेत. केंद्रात आरोग्यमंत्री तसेच राज्यात वनमंत्रीपदही त्यांनी भूषविले आहे. 2018 च्या निवडणुकीत वयाचा दाखला देत भाजपाने त्यांना तिकिट नाकारले होते.

टी-20 चा निकाल द्यायचाच; शिवराज सिंहची कोपरखळी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत त्यांनी सर्व मंत्र्यांना टी-20 खेळत असतानाच चांगले निकालही द्यायचे आहेत असे आवाहन केले. यासोबतच त्यांनी महामंडळे तसेच मंडळांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देतानाच आत्मनिर्भर मध्य प्रदेशचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.