सत्ता मिळाल्यास गृहिणींना सुरु करणार पगार, कमल हसन यांच्या पक्षाची घोषणा

सध्या अभिनयातील कारकिर्दीला रामराम ठोकून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या कमल हसन यांच्या पक्षाने दिलेलं एक आश्वासन चांगलंच गाजतंय. कमल यांच्या MNM पक्षाने (मक्कल निधी मय्यम) तामिळनाडूमधील सर्व गृहिणींना एक आश्वासन दिलंय. जर एमएनएम पक्षाचं सरकार सत्तेवर आलं, तर सर्व गृहिणींना पगार सुरू केला जाईल, असं कमल हसन यांनी जाहीर केलंय.

निवडणुका आल्या की राजकीय पक्ष वेगवेगळी आश्वासनं द्यायला सुरुवात करतात. त्यातील काही आश्वासनं लक्षवेधी ठरतात आणि चर्चेचा विषय बनतात. काही आश्वासनं ही खरोखरच परिणामकारक ठरतात आणि त्याचा फायदा आश्वासन देणाऱ्या पक्षाला होताना दिसतो. तर काही आश्वासनं ही गांभिर्यानं घेतली जात नाहीत. केवळ चर्चेपुरतीच ती उरलेली दिसतात.

सध्या अभिनयातील कारकिर्दीला रामराम ठोकून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या कमल हसन यांच्या पक्षाने दिलेलं एक आश्वासन चांगलंच गाजतंय. कमल यांच्या MNM पक्षाने (मक्कल निधी मय्यम) तामिळनाडूमधील सर्व गृहिणींना एक आश्वासन दिलंय. जर एमएनएम पक्षाचं सरकार सत्तेवर आलं, तर सर्व गृहिणींना पगार सुरू केला जाईल, असं कमल हसन यांनी जाहीर केलंय.

गृहिणी या दिवसभर घरासाठी कष्ट घेत असतात. मात्र त्यांना कुठलाही आर्थिक मोबदला मिळत नाही. या गोष्टीचा विचार करून गृहिणींना पगार सुरू करणार असल्याचं आश्वासन कमल हसन यांनी दिलंय. त्याचसोबत प्रत्येक घरी हाय स्पीड इंटरनेट सुविधा मोफत पुरवली जाईल, असं आश्वासनही देण्यात आलंय. तर शेतकऱ्यांसाठी कृषी आधारित उद्योगांना चालना दिली जाईल, असंही एमएनएमनं आश्वासन दिलंय.

दारिद्र्य रेषेखालील लोकांना समृद्धी रेषेपर्यंत आणलं जाईल, असं सांगतानाच गरीबी कमी करण्यासाठी विविध उपायांची यादी हसन यांच्या पक्षानं जाहीर केलीय. महिलांचा सन्मान करण्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना आणत राहू, असंही त्यांनी म्हटलंय.