Kamal Nath to step down as state president; That said, the desire to rest now

कमलनाथ मध्यप्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते तर आहेतच शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यही आहेत. त्यामुळेच जेव्हा पोटनिवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा स्वकियांनीच त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. राज्यातील नेतेही आता राज्यात युवा नेतृत्वाची गरज असल्याचे म्हणू लागले आहेत आणि पराभवाचे खापर कमलनाथ यांच्या डोक्यावर फोडत आहेत. कमलनाथ यांच्यावर तिकिट वाटपापासून गंभीर आरोप करण्यात आले आहे.

छिंदवाडा : मध्य प्रदेशात सर्वप्रथम सत्ता गमावली आणि आता पोटनिवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी ‘मनकी बात’ केली आहे. छिंदवाडा येथे समर्थकांना संबोधित करताना कमलनाथ यांनी राजकारण सोडण्याचे संकेत दिले आहेत. आता विश्रांती घेण्याची इच्छा असून आयुष्यात बरेच काही प्राप्त केले असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये कमलनाथ यांच्यावर सतत टीका केली जात असतानाच त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थही काढले जात आहेत. कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्यावर की राजकारण संन्यास घेण्यावर मत व्यक्त केले आहे यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

पराभव जिव्हारी लागला

कमलनाथ मध्यप्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते तर आहेतच शिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यही आहेत. त्यामुळेच जेव्हा पोटनिवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा स्वकियांनीच त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. राज्यातील नेतेही आता राज्यात युवा नेतृत्वाची गरज असल्याचे म्हणू लागले आहेत आणि पराभवाचे खापर कमलनाथ यांच्या डोक्यावर फोडत आहेत. कमलनाथ यांच्यावर तिकिट वाटपापासून गंभीर आरोप करण्यात आले आहे.

यापूर्वी जेव्हा राज्यात विधानसभा निवडणूक झाली होती त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात शर्यतच लागली होती. त्यावेळी कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले होते.

काही काळानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकताच त्याचे परिणाम काँग्रेस आजही भोगत आहे. सर्वप्रथम शिंदे समर्थकांनी राजीनामा देत सरकार पाडले आणि आता पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर विजयही मिळविला.

केंद्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे कमलनाथ राज्याच्या राजकारणात सक्रिय? होताच त्यांना मुख्यमंत्रिपदही मिळाले होते. परंतु एका पाठोपाठ एक पराभव आणि शिंदेनी केलेला रामराम तसेच त्याचे परिणाम यामुळे कमलनाथ सतत बॅकफूटवर आले आहेत.

दिग्गींची उपेक्षा केल्यानेच पराभव

आपल्या विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे श्योपूर येथील काँग्रेसचा आमदार बाबूलाल जंडेल यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना घरचा अहेर दिला आहे. दिग्विजय सिंह यांची उपेक्षा केल्यामुळेच राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली असा थेट आरोपच त्यांनी केला. ते येथे एनएसयूआय कार्यकर्ता संमेलनाला संबोधित करीत होते त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.काँग्रेस नेत्यांनीच पोटनिवडणुकीत दिग्वजियसिंह यांना आऊट केले असे ते म्हणाले.

काँग्रेसनेच केले आऊट

एनएसयूआयच्या संमेलनात जंडेल यांनी भाषणाला सुरुवात करताच पक्षाच्याच नेत्यांवर सडकून टीका केली. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी पक्षासाठी मोठा त्याग केला आहे असे ते म्हणाले. कलमनाथ यांचे नाव न घेता ते म्हणाले की, आज दिग्विजयसिंह यांना मध्य प्रदेश काँग्रेसनेच आऊट केले आहे. दिग्विजयसिंह चर प्रचारात येतील तर काँग्रेस पराभूत होईल असे काँग्रेसचे नेतेच म्हणत होते असेही ते यावेळी म्हणाले. आता काँग्रेसचा पराभव कोणी केला असा सवाल करतानचा दिग्विजयसिंह तर प्रचारास गेले नव्हते असे ते म्हणाले. मग काँग्रेस का पराभूत झाला असा प्रश्न विचारताच सर्व तिकिटाची महिमा होती असा विनोदही त्यांनी केला.