Star Pracharak status

निवडणूक आयोगाने ही कारवाई वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी केली असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता उमेद्वाराच्या खर्चात कमलनाथ यांच्या सभेचा खर्च जोडला जाईल. तसेच कमलनाथ यांच्या विमान वाहतुकीचा खर्चही वाढवला जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath ) यांना पोटनिवडणुीकीपूर्वी निवडणूक आयोगाने  (Election Commission

) कारवाई केली आहे. कमलनाथ यांनी महिला उमेद्वाराबाबत आयटम या शब्दाचा वापर केला त्यामुळे त्यांचे स्टार प्रचारक पद काढून घेतले आहे. अशाप्रकारे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई केल्यामुळे काँग्रस पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने ही कारवाई वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी केली असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता उमेद्वाराच्या खर्चात कमलनाथ यांच्या सभेचा खर्च जोडला जाईल. तसेच कमलनाथ यांच्या विमान वाहतुकीचा खर्चही वाढवला जाईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. जे कोणी निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक असतात त्यांचा खर्च खात्यातून केला जातो त्याचा भार उमेरदावाराच्या खर्चात टाकला जात नाही.