kangna

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी ट्विट करणाऱ्याअभिनेत्री कंगना राणौत विरुदध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील न्यायालयाने दिले आहेत.(court of karnataka directs to file fir against kangana) वकील रमेश नाईक यांनी न्यायालयात  कंगना विरोधात याचिका दाखल केली होती.

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी ट्विट करणाऱ्याअभिनेत्री कंगना राणौत विरुदध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील न्यायालयाने दिले आहेत.(court of karnataka directs to file fir against kangana) वकील रमेश नाईक यांनी न्यायालयात  कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करण्यात आली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल(fir against kangana) करण्यास सांगितले आहे.

वकील रमेश नाईक म्हणाले की, न्यायालयानं याचिकेवरून  पोलिसांना एफआयआर दाखल करायला सांगितले आहे.तसेच याप्रकरणी तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. विधेयकांचं कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी राज्यसभेत कृषी विषयक दोन्ही विधेयके मंजूर करण्यात आली होती. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी सरकारविरोधात आवाज उठवला. दिल्ली, हरयाणा इत्यागी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते.

कृषी विधेयकाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांना ‘एमएसपी’बदलणार नाही, हे सांगितले होते. यावर आता अभिनेत्री कंगना रणौत हिने मोदींच्या ट्वीट रिट्वीट केले. तसेच मोदींचे समर्थन करत विरोधकांवर टीकादेखील केली. कंगना विरोधकांच्या बाबतीत असे म्हणाली होती की, कोणी झोपलं असेल तर त्याला जाग करता येत. ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र झोपण्याचं सोंग करणाऱ्यांना ,न समजल्याचा आव आणणाऱ्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहेत. सीएएमुळे कुणाचेही नागरिकत्व गेले नाही. मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले.