कन्हैया कुमारचे ‘नेतृत्व’ पक्षासाठी ठरतेय डोकेदुखी; पक्षातील जुन्या नेतृत्वाकडून कारवाईची मागणी

कन्हैयाच्या सदस्यत्वामुळे मोडखळीस आलेल्या बेगूसरायमध्ये पुन्हा डाव्यांचे राज्य स्थापन करू शकू असा विश्वास पक्षाला वाटत होता. मात्र झाले उलटेच, आता प्रश्न आहे की बिहार निवडणुकीनंतर माकप कन्हैया कुमार यांना पक्षाशी जोडून घेतल्याचा पश्चाताप का करत आहे?

पाटना: बिहारमधील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय मधून उदयास आलेले कन्हैया कुमारचे नेतृत्व आता पक्षासाठी डोके दुखी ठरत आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारने बेगुसरायमधील निवडणुकी दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अधिकृत सदस्यत्व घेतले. कन्हैयाच्या सदस्यत्वामुळे मोडखळीस आलेल्या बेगूसरायमध्ये पुन्हा डाव्यांचे राज्य स्थापन करू शकू असा विश्वास पक्षाला वाटत होता. मात्र झाले उलटेच, आता प्रश्न आहे की बिहार निवडणुकीनंतर माकप कन्हैया कुमार यांना पक्षाशी जोडून घेतल्याचा पश्चाताप का करत आहे?

ही आहे डोके दुखी

– कन्हैया आपली स्वतंत्र ओळख मानतात. त्यांच्या ओळखीमध्ये पक्षाचे कोणतेही योगदान स्वीकारण्यास ते तयार नाहीत.
– पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये अतिशय घट्टपणे चालणे त्यांना पटत नाही.
– कन्हैया जुन्या नेतृत्त्वाची ताकद मानत नाहीत.

पक्ष काय म्हणतो ?
– पक्षाला असे वाटते की कन्हैया जे काही आहे ते केवळ पक्षामुळे आहे.
– कन्हैयाने पक्षाला विचारात न घेता त्यांच्या इच्छेनुसार बरीच पावले उचलली
– कन्हैयाने त्यांच्या ‘अहंकार’मुळे अनेक उमेदवारांचे बरेच नुकसान केले.
– कन्हैया यांनी युवकांना पक्षाशी जोडले जावे अशी अपेक्षा होती, परंतु त्यातही तो अपयशी ठरला आहे
– त्याने केवळ स्वत: ची ब्रँडिंग करण्यावर भर देतोय.

या वादामुळे स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाकडून तसेच पक्षातील जुन्या नेतृत्वाकडूनही कन्हैया कुमारवर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यामुळे पक्षही त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची संकेत मिळत आहेत .