कर्नाटकात नेतृत्वबदल- मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पांचा राजीनामा, राज्यातील भाजपा सरकारला दोन वर्षे पूर्ण होताच पदावरून पायउतार

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा(Resignation BY Yediyurappa) देणार असल्याचे जाहीर केले आहे.

  बंगळुरु : कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा(Yediyurappa Resgination) यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. दुपारी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा(Resignation after Meeting Governor) सोपवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यात आजच भाजपा सरकारला दोनो वर्षे पूर्ण झाली असून, त्याचदिवशी येडियुरप्पा यांचे राजीनामानाट्य घडणार आहे.

  यापूर्वी १६ जुलैला येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. अचानक झालेल्या या दोन नेत्यांच्या भेटीनंतर येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय. वर्तुळात रंगली होती. पंतप्रधानांच्या भेटीनंतर येडियुरप्पा यांनी अमित शाह, राजनाथसिंह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेतली होती.

  भाजपासमोर मुख्यमंत्रीपदासाठी कोणते पर्याय ?

  •  कर्नाटकात २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. खरंतर ७८ वर्षीय येडियुरप्पा यांच्याव्यतिरिक्त आत्तातरी भाजपापुढे सक्षम पर्याय दिसत नाही.
  •  येडियुरप्पा लिंगायत समाजातील मात्तबर नेते म्हणून ओळखले जातात. कर्नाटकाच्या राजकारणातील मोठे नेते अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रतिमेचा नेता आत्तातरी काँग्रेससह कोणत्याही पक्षाकडे नाही.
  •  अशा परिस्थितीत येडियुरप्पा पायउतार झाले तरी इतर कुणाला मुख्यमंत्री करायचे सेल तर त्यासाठी येडियुरप्पा यांच्या पाठिंब्याची गरज आहे.
  • अशा परिस्थितीत जर येडियुरप्पा यांनी भाजपाची साथ सोडली, तर राज्यात याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  यापूर्वीही येडियुरप्पा यांनी त्यांची राजकीय ताकद दाखवली आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी ३१ जुलै २०११ रोजी भाजापाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांनी कर्नाटक जनता पक्ष नावाने स्वतःचा पक्षही स्थापन केला होता.भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले होते. लोकायुक्तांनी अवैध खाण घोटाळा प्रकरणाची चौकशी केली होती, त्यात येडियुरप्पा यांचे नाव समोर आले होते. याचा भाजपाच्या प्रतिमेवर परिणाम झआला होता. त्यानंतर २०१४ साली ते पुन्हा भाजपात परतले होते. त्यानंतर २०१८ साली कर्नाटकातील राजकीय नाट्यमय घडामोडीत त्यांनी अडीच दिवसांचे सरकार स्थापन केले होते, त्यानंतर विधानसभेत भावनिक भाषण करत त्यांनी पदत्याग केला होता. त्यानंतर २०१९ साली पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करत ते मुख्यमंत्रीपदी आरुढ झाले होते. कर्नाटकातील आपली राजकीय ताकद त्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींना दाखवून दिली होती.

  पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.

  karnatak chief minister yediyurappa gave resignation of chief ministership