ramesh jarkiholi

 आक्षेपार्ह सीडी प्रकरणात(Karnatak Sex CD scandal) कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण उजेडात येताच रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा(resignation of ramesh jarkiholi) दिला आहे.

    आक्षेपार्ह सीडी प्रकरणात(Karnatak Sex CD scandal) कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे. या सीडीमध्ये रमेश जारकीहोळी आणि एक तरुणी दिसत आहे.हे प्रकरण उजेडात येताच रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा(resignation of ramesh jarkiholi) दिला आहे.

    दरम्यान,रमेश जारकीहोळी यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण त्यांना भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

    मिळालेल्या मााहितीनुसार, नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण सगळ्यांसमोर आणले आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे.

    बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.