कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाला असून, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच यांसदर्भात येडियुरप्पा यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाला असून, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच यांसदर्भात येडियुरप्पा यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विटर वरुन मला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. 

माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण, मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रूग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करावी आणि सेल्फ क्वारंटाईन व्हावे, अशी मी विनंती करतो, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून येडियुरप्पा यांनी लॉकडाऊनसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आहेत. काहीही झाले तरी, आता पुन्हा लॉकडाऊन करणार नाही असा निर्धार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवला होता.