कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा राजीनामा; युवकाने केली आत्महत्या

    कर्नाटक : येदियुरप्पांच्या राजीनाम्यामुळे नाराज युवकाची आत्महत्याबंगळुरू (ए). कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याचे परिणाम राजकारणासह जनतेवरही होत असल्याचे दिसत आहे. चामराजनगरच्या एका युवकाने येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे आत्महत्या केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि युवकाच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.

    येदियुरप्पा यांनी 35 वर्षीय रविच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केले आहे. कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांनी कन्नडमध्ये ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, रवीने माझ्या राजीनाम्यामुळे आत्महत्या केली, ही बातमी माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे.

    राजकारणात चढउतार येत असतात. मात्र, म्हणून कोणीही आपले आयुष्य संपवावे हे चुकीचे आहे. ज्या परिस्थितीतून सध्या त्याचे कुटुंब जात आहे, त्याची भरपाई करणे शक्य नाही.