कर्नाटक सरकारने ७ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन (Karnataka Covid lockdown) हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

    नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,59,591 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,209 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,91,331 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

    काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील लॉकडाऊन (Karnataka Covid lockdown) हा 7 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.