केरळ भूस्खलनातील मृतांचा आकडा २४ पार

  • केरळमध्ये मुसळधार पावसामुळे काल शुक्रवारी भूस्खलन झाले. या भूस्खलना चहामळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या २० झोपड्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत. यामुळे ४६ जण बेपत्ता आहेत. तर २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले होते.

कोची – केरळमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. इडूक्की जिल्ह्यात डोंगरालगत शेतकऱ्यांच्या झोपड्या होत्या, या झोपड्या भूस्खलनाच्य़ा ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत. यामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही ४६ जण बेपत्ता आहेत.

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे काल शुक्रवारी भूस्खलन झाले. या भूस्खलना चहामळ्यात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या २० झोपड्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत. यामुळे ४६ जण बेपत्ता आहेत. तर २४ लोकांचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले होते. एनडीआरएफच्या २ टीम कार्यरत असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक त्यांना मदत करत आहेत. ढिगाऱ्याखालून १२ जणांना काढण्यात यश आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. भूस्खलनानंतर परिसर सपाट होऊन चिखल झाला आहे. त्यामुळे बचाव कार्य करण्यात प्रचंड अडथळे येत आहे.