केरळचे 14 जिहादी भारतासाठी टेन्शन; इसिसने रचला भारताविरोधात कट

बगरामच्या तुरुंगातून सुटलेल्या केरळच्या 14 जणांपैकी एकाने आपल्या घरी संपर्क साधला होता. उरलेले 13 जण आयएसकेपीच्या दहशतवाद्यांसोबत काबुलमध्ये आहेत. 2014 मध्ये इसिसने इराकमधील मोसूल शहरावर ताबा मिळवला. त्यावेळी केरळच्या मल्लपुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातून काही तरुण भारताबाहेर जाऊन जिहादी गटांमध्ये सहभागी झाले होते.

    दिल्ली : काबुलमध्ये झालेला हा बॉम्बस्फोट भारतासाठी सुद्धा धोक्याची घंटा असून केरळचे 14 रहिवाशी या इस्लामिक स्टेट ऑफ खोरासनसाठी काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवताच बागराम जेलमधून या 14 जणांना मुक्त केले आहे. 26 ऑगस्टला काबुलमधील तुर्कमेनिस्तानच्या दूतावासाबाहेरही स्फोट घडवण्याचा प्रयत्न झाला. पण ते अयशस्वी ठरले. या संबंधात दोन पाकिस्तानीना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

    बगरामच्या तुरुंगातून सुटलेल्या केरळच्या 14 जणांपैकी एकाने आपल्या घरी संपर्क साधला होता. उरलेले 13 जण आयएसकेपीच्या दहशतवाद्यांसोबत काबुलमध्ये आहेत. 2014 मध्ये इसिसने इराकमधील मोसूल शहरावर ताबा मिळवला. त्यावेळी केरळच्या मल्लपुरम, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यातून काही तरुण भारताबाहेर जाऊन जिहादी गटांमध्ये सहभागी झाले होते.

    काबुलमधील फिदाईनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तालिबान आणि अल कायद्यापेक्षा धर्मांध मानल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेट खोरासनने (इसिस-के) घेतली आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून, भारतावर इसिस-केचा धोका वाढला आहे. ही संघटना दक्षिण आशिया आणि नंतर भारतात घुसखोरी करू शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. तरुणांना त्यांच्या संघटनेशी जोडणे आणि नंतर दहशतवादी हल्ले करणे हा या संघटनेचा हेतू आहे. त्यामुळे भारतात घुसून ही संघटना जिहादी मानसिकता तयार करु शकते, असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.

    काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यांच्या मालिकेनंतर आता दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात एक्यूआयएस, आयएसकेपी आणि हक्कानी नेटवर्क या तीन दहशतवादी संघटनांच्या संभाव्य धोकादायक मनसुब्यांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खोरासान प्रोव्हींस (आयएसकेपी), अलकायदा इन इंडियन सबकाँटिनेंट (एक्युआयएस) आणि हक्कानी नेटवर्क यांच्या प्रत्येक हालचालीवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखली आहे. अफगाणि-पाकिस्तान समर्थित या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानी गुप्चर संस्था आयएसआयच्या साह्याने कारस्थान रचले असल्याचे समजते.