Killing a child, roasting meat with ghee and spices! The shocking act of the birth mother

कोलकाता : अंधश्रद्धेच्या नादात एका महिलेने आपल्या मुलीची हत्या केली आहे. या महिलेने नुसती मुलाची हत्या केली नाही तर, तूप-मसाले लावून तिचे मांस भाजलं. क्ररतेचा कळस गाठणारी ही घटना कोलकात्यामध्ये घडली आहे.

गीता माहेनसरिया असं या या महिलेचं नाव आहे. पती पासून विभक्त झालेली ही महिला आपल्या तीन मुलांसह वेगळी राहत होती. मात्र, तिचा मोठा मुलगा तिच्या पतीच्या संपर्कात होता. मात्र, अनेक दिवसांपसून मुलाशी संपर्क न झाल्यने तिच्या पतीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

यानंतर पोलिस या महिलेच्या घरी दाखल झाले. या वेळी घराची तपासणी केली असता. पुरुषाच्या हाडांचे अर्धवट जळलेले अवशेष आढळून आले.

गीतानेच आपल्या मुलाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. हत्या केल्यानंतर मानवी मांसाच्या भाजण्याचा वास येऊ नये म्हणून तिने त्यावर तूप, कापूर आणि मसाले शिंपडले. त्यानंतर तिने त्याची हाडं टॉवेलमध्ये गुंडाळली आणि घराच्या छतावर नेऊन टाकली.

घटनास्थळावरुन पोलिसांना रक्ताने माखलेला दगड, हाडं गुंडाळलेला टॉवेल तसंच काही अन्य आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या आहेत.
काळ्या जादूच्या नादी लागून गीताने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले.