दोन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा; भारतीय जवानांची लष्करी कारवाई

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करविण्याच्या उद्देशाने नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला त्याची ही नापाक कृती पुन्हा एकदा भारी पडली आहे. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

सैन्याचा मृत्यूची माहिती देण्यापासून नेहमी पळ काढणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला भारतीय सैनिकांनी त्यांचे दोन सैनिक मारल्याचे सांगावे लागले आहे. पाकिस्तानी लष्कराने सांगितले आहे की, नियंत्रण रेषेवरील खुईराता सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक लांस नायक तारिक आणि शिपाई जरूफ यांचा मृत्यू झाला आहे.

याचबरोबर, पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारताचे दोन सैनिकही मारले गेले आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे.