क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे राष्ट्र हितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी”, प्रज्ञा सिंह ठाकूर

क्षत्रियाला क्षत्रिय म्हटलं तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटलं की, वाईट वाटतं. कारण काय आहे? तर समजू शकत नाही.

भोपाळ : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेल्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत . मध्य प्रदेशच्या सेहोर येथील एका कार्यक्रमात त्यांनी वर्ण व्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. “ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. मात्र शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. कारण काय आहे, तर समजत नाही” असं म्हटलं आहे. तसेच “राष्ट्रहितासाठी क्षत्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी” असं देखील वादग्रस्त विधान ठाकूर यांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. “क्षत्रियाला क्षत्रिय म्हटलं तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हणा, तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटलं, तर वाईट वाटत नाही. शुद्राला शुद्र म्हटलं की, वाईट वाटतं. कारण काय आहे? तर समजू शकत नाही” असं विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार?” असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.